प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – लोक गावाकडून शहरात उपचारासाठी जातात, मात्र शहरातून गावाकडे येऊन हाताचे ऑपरेशन यशस्वी करून घेणारे श्री. विनोद बाबुराव जुंभळे, राहणार नेहेता, ता. रावेर, जि. जळगाव, ह. मुं. सुरत यांचा अनुभव सध्या रावेर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. समर्थ हॉस्पिटल, रावेर येथील सुप्रसिद्ध हाडांचे तज्ञ डॉ. भगवान कुयटे सर यांनी त्यांचे हाताचे ऑपरेशन अत्यंत कुशलतेने व यशस्वीपणे पार पाडले.
विनोद जुंभळे यांना हाताच्या ऑपरेशनसाठी भुसावळ, जळगाव, सुरत येथील डॉक्टरांनी संचेती हॉस्पिटल, पुणे येथे जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी मोठ्या विश्वासाने सुरत शहरातून आपल्या गावाकडे येत समर्थ हॉस्पिटल, रावेर येथे डॉ. भगवान कुयटे सरांकडे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. दि. 11/10/2026 रोजी झालेले ऑपरेशन अत्यंत व्यवस्थित व यशस्वी झाले असून आज ते पूर्णपणे बरे आहेत.
रुग्णसेवेचा खरा आदर्श:- स्व. लीलाबाई राजाराम कुयटे यांच्या स्मृती जपण्यासाठी डॉ. कुयटे सर गेली 11 वर्षे दर महिन्याच्या 21 तारखेला गरजू रुग्णांना मोफत तपासणी देतात. तसेच दर महिन्याच्या 9 तारखेला डॉ. सुचिता कुयटे आपले वडील स्व. शंकरराव कांडळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत तपासणी शिबीर घेतात. या उपक्रमातून आतापर्यंतच्या सेवा दिलेल्या आहेत.
रुग्णसेवेतील या उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. भगवान कुयटे यांना सन *2018 साली नवी दिल्ली येथे राष्ट्रीय एकता परिषदचा मेडिकल एक्सलंट पुरस्कार* भारताचे अर्थमंत्री सौ. निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
या यशस्वी उपचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि. 18/11/2026 रोजी डॉ. भगवान कुयटे सर व त्यांच्या पत्नी सौ. सुचिता कुयटे यांचा, भूल तज्ञ डॉ. निलेश पाटील यांचा तसेच श्री. दीपक सावळे व समर्थ हॉस्पिटल स्टाफचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला
हा सत्कार भोळे कॉलेज, भुसावळचे प्रा. डॉ. अनिल सावळे सर व त्यांच्या पत्नी सौ. वैशाली सावळे, श्री. विनोद बाबुराव जुंभळे व त्यांच्या पत्नी सौ. संगीता जुंभळे व संपूर्ण जुंभळे परिवार तसेच परम मित्र श्री. सुनीलभाऊ चौधरी, सावदा यांच्या वतीने करण्यात आला
या प्रसंगी उपस्थित राहणारे मान्यवर : मुले – कु. नेहा विनोद जुंभळे, कुणाल विनोद जुंभळे, बहिण व मेहुणे – सौ. कुसुम लक्ष्मण अहिरे, श्री. लक्ष्मण झगडू अहिरे, नातेवाईक व मित्र परिवार – सौ. पर्वताबाई रमेश वाघ, सौ. नंदा एकनाथ सोनवणे, भाचे प्रवीण अहिरे, पंकज अहिरे, पूर्वेश सोनवणे, भाचे जावई सचिन समाधान चऱ्हाटे, एकनाथ वाघ, विशाल तायडे, दिलीप सुधाकर सोनवणे, श्री. जितेंद्र काटे सर, श्री. नगीनदास वाघ, श्री. अमोल यशवंत वाघ तसेच तांदलवाडी पोलीस पाटील जगदीश नमायते उपस्थित होते.







