कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना व विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत आणि सत्कार
जळगाव : भूमी अभिलेख विभागातील अधिकारी मा. शितल लेकुरवाळे-सावळे यांची पदोन्नतीने जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यांच्या पदोन्नतीबद्दल उपस्थित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत त्यांना पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटन सचिव नुपम मेढे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिकचे विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना जळगावचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाडे, विभागीय उपाध्यक्ष दिनेश ठाकूर, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार पाटील, महिला उपाध्यक्षा श्रीमती ममता मेढे-बेहेरे, संघटनेचे सदस्य राहुल बारी, जयदीप गाढे आणि अभिषेक पाटील उपस्थित होते.
तसेच महसूल विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश अडकमोल, महेश सपकाळे, सुनील कराटे, संदीप खैरे, कोषागार विभागाचे रवींद्र गायकवाड, कृषी विभागाचे किशोर मराळे, पाटबंधारे विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, सचिव भाऊजी हटकर, कार्याध्यक्ष विकी गोंधळी, गुरुनाथ शेंगदाणे यांच्यासह कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगावचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शितल लेकुरवाळे-सावळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. त्यांच्या पदोन्नतीमुळे भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, तसेच कर्मचारी आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक कार्य घडेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
या स्वागत व सत्कार सोहळ्यामुळे कर्मचारी संघटनांमधील एकजूट आणि परस्पर सहकार्याचे दर्शन घडले. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.






