तळोदा – येथे सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा ,कृपासिंधू सेवाभावी संस्था तळोदा व कलाल समाज नवयुवक गणेश मंडळ संयुक्ताने दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी तळोदा येथे व्याख्यानेच्या कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते सचिन देवरे सर पाचोरा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा.श्री.संजय शर्मा सर प्राचार्य सीनियर कॉलेज,तळोदा तळोदा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री.अजय भैय्या परदेशी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.श्री.शशिकांतजी वाणी तळोदा,तळोदा कलाल समाजाचे अध्यक्ष श्री.संजू भाऊ कलाल, सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे कृपासिंधू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र भाऊ कलाल कलाल समाज नवयुवक मंडळाचे अध्यक्ष आनंद कानडे मंचावर उपस्थित केले . प्रथम भारत माता , छत्रपती शिवाजी महाराज फुलहार अर्पण करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला सुत्रसंचलन अमित कलाल सर यांनी केले. यावेळेस मान्यवरांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री.संजय शर्मा सर म्हणालेत की, तळोदा शहरात अशाप्रकारे व्याख्यानमाला ठेवून छत्रपती शिवराय आणि आजची तरुणाई या विषयावरती सेवाभावे,कृपासिंधू या संस्थेने हे जे व्याख्यानमाला ठेवली आहे अशा व्याख्यानमाला तळोद्यात अजून झाल्या पाहिजे.आजच्या तरुणाईला एक योग्य दिशेने झाले. यावेळी कार्यक्रमाला आलेले प्रमुख वक्ते मा.श्री.सचिन देवरे सर हे म्हणाले की, आजची तरुणाई ही कुठेतरी भरकटत आहे आजच्या तरुणाईला सर्वात मोठे लागलेले व्यसन म्हणजे मोबाईल होय. आजच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांच्याकडून घेतले जाणारे आदर्श आदर्शाने आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे आजच्या तरुणाईला समजले पाहिजे.
या कार्यक्रमासाठी तळोदा कलाल समाज मंडळाचे अध्यक्ष संजय कलाल यांनी अध्यक्षीय भाषण केले यावेळी कार्यक्रमाला जितेंद्र कलाल, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे,महेंद्र कलाल,प्रकाश कलाल, दीपक कलाल, जितेंद्र कलाल,चेतन कलाल, यांसह समाजातील मान्यवर नवयुवक आनंद कलाल,हेमंत गिरनार, धीरज कलाल, महेश कलाल, सौरव कलाल,लकेश कलाल,कमलेश कलाल,निलेश कलाल, गिरीश कलाल , चंद्रेश कलाल,अक्षय कलाल,मयूर कलाल,भूपेंद्र कलाल व समाज बांधव व नवयुवक मंडळाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा व कृपासिंधू सेवाभावी संस्था,तळोदा यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या आभार सेवाभावी प्रतिष्ठान,तळोदा अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे केले.










