250 रुपये घ्या, मुख्यमंत्र्यांच्या सभेला या! रिकाम्या खुर्च्यांची गद्दारांना धास्ती, गर्दी जमवण्यासाठी ‘रेटकार्ड’ जाहीर

0
43

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत ‘भाडोत्री’ गर्दी जमवण्यासाठी ‘रेटकार्ड’ जाहीर झाले आहेत. याच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे गद्दार संदिपान भूमरे यांनी ‘रिकाम्या खुर्च्या’ ची प्रचंड धास्ती घेतल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघातून पैसे देऊनही लोकं येण्यास राजी नसल्याने संभाजीनगर व जालना भागातील लोकांना ‘रोजंदारी’ मिळणार असल्याचे या व्हायरल क्लिपमुळे स्पष्ट झाले आहे. एकीकडे सत्ता असलेल्या संस्था व मंत्रीपदामुळे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना गर्दीसाठी कामाला लावण्यात आले आहे. तर दुसरीकडे महिलांच्या गर्दीसाठी चक्क ‘ठेका पद्धत’ अवलंबली जात आहे.

या पार्श्वभूमीवर काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यातील दोघांच्या संवादात भाडोत्री गर्दीचा हा फंडा समोर आला आहे. त्यानुसार वाहनांसह महिलांना प्रत्येकी 250 रुपये देण्याची व्यवस्था करण्यात आली असून रक्कम आगाऊ स्वरुपात दिली जाईल. मंत्री संदीपान भूमरे यांचे चिरंजीव व त्यांचा मेहुणा यांनी सर्व ‘व्यवस्था’ रोख स्वरूपात केलेली आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स नुसार, “अहो ही झाली रोजंदारी… नाष्टा – जेवणाचे काय ?” असा प्रश्न केल्यावर “हो… हे सर्व होऊन जाईल. रस्त्यात व्यवस्था करण्यात आली आहे. काळजी करू नका.” असे आश्वासित करण्यात आलं आहे. तसेच “कितीही महिला आणा. जागेवरच पैसे दिले जातील. मी देणार नाही. पण माणसे नेमलेली आहेत.” असेही या ऑडिओ क्लिप्समध्ये ऐकू येत आहे.

Spread the love