रावेर – तालुका मेडिसीन डिलर्स असोसिएशन रावेर तर्फे आयोजित फार्मासिस्ट दिन महाजन हॉस्पिटल येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेंद्र पाटील हे होते.यावेळी संजय चौधरी व गोविंद भाऊ महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर रावेर पंचायत समिती मध्ये आदिवासी अती दुर्गम भागातील गारखेडा, मोरव्हाल, पिंपरकुंड, मुंजलवाडी, निंमड्या या जिल्हा परिषद शाळांना सचिव प्रवीण सरोदे , प्रथमेश मेडिकल, रावेर प्रायोजित प्रथमोपचार पेटी चे वितरण पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी श्री. शैलेश दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी विलास कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ऊमेश श्रावगी ,रसलपूर यांच्याकडून फार्मासिस्ट बांधवांना डायरीचे वितरण करण्यात आले.यावेळी प.स चे मानकर सर, महाजन सर, कासम तडवी, विलास पाटील, मुनाफ तडवी
सर्व कार्यकारणी सदस्य व रावेर तालुक्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक अजय पाटील, मानकर सर यांनी केले. आभार लखन सावळे यांनी व्यक्त केले.











