समाजकारणाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी करु नका ..आदिवासी कोळी महासंघाच्या बैठकीत सुर

0
47

 प्रतिनिधी – राजेंद्र महाले

रावेर – तालुक्यातील आदिवासी कोळी समाज बांधव तसेचआदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समितीची बैठक जिल्हा अध्यक्ष सुभाष सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली ऐनपुर येथे मीटिंग संपन्न झाली . त्यात कोळी समाजाचे अभ्यासु व्यक्तीमत्व माननीय माजी कॅबिनेट मंत्री श्री.दशरथजी भांडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात तसेच आद्यकवी महर्षी वाल्मिकी जंयत्ती साजरी करण्यासाठी आणि मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पाठपुरावा व बैठकी संदर्भात सामाजिक व संघटनात्मक विचार विनिमय करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित केली होती तालुका अध्यक्ष मनोहर कोळी यांनी प्रस्तावना मांडली.आ.कोळी स. उपाध्यक्ष नितीन भाऊ कोळी यांनी आपल्या मनोगतात काही स्वार्थी लोक समाज्याचा गैरवापर करून देखावा करतात आणि स्वत:ची पोळी समाजकारण भासवून राजकारण करीत आहे तालुक्यात बरेच जेष्ठ,श्रेष्ठ, तंज्ञ विचारवंत,अनेक संघटनेचे जिल्हा, तालुका अध्यक्ष असतांना त्यांना माहीती न देता परस्पर समाज्याच्या ज्वलंत प्रश्नावर अगदी ५/६ लोक लोकप्रतिनिधी मार्फत निवेदन देतात हे समाजासाठी घातक आहे.अशा व्यक्तींना आळा घालणे गरजेचे आहे त्यांना समाजाचे काही देणे घेणे नाही फक्त वैयक्तिक स्वार्थ ..या विषयावर सर्वानी संमती दर्शवली.बंडु कोळी यांनी तालुका स्तरावर रॅली काढून जयंती साजरी करावी.म्हणून सुचवले. गंभीर दादांनी जयंती कै. नितीन जैतकर यांच्या कार्याला समर्पित म्हणून साजरी करण्यासाठी तालुका उत्सव समिती स्थापन करण्याची सुचना केली .चंद्रकांत कोळी नवयुवक तरुणांना नेतृत्व केले द साजरी करावी व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.विश्वनाथ कोळी यांनी भांडे साहेबांच्या माध्यमातून आझाद मैदान वरील उपोषणाची दखल म्हणून मा.आ.चंद्रकांत पाटील यांनी मा.मुख्यमंत्री यांना समाजावर होणाऱ्या अन्याय बाबत भांडे साहेब फार भांडत आहे त्या संदर्भात भांडे साहेबांनी निवेदन दिले त्यावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.तसेच लवकरच मिटींग आयोजित केली जाईल असे आश्वासित केले.अध्यक्षीय मनोगतात सुभाष सपकाळे यांनी समाजिक कार्यासाठी तळमळीने झटणारे कुशल नेतृत्व मा. भांडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केली जावे म्हणून मार्गदर्शन केले साहेब नेहमी आपल्या समाजावर होणारे अन्यायाविरुद्ध अग्रेसर असतात असे अभ्यासु नेतृत्व मिळणे आपले भाग्य आहे.त्यावेळी आदिवासी कोळी महासंघाच्या तालुका सल्लागार म्हणून निंभोरा बु” येथील पत्रकार श्री राजेंद्र महाले यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच तालुका उत्सव समिती स्थापन केली

खालील प्रमाणे अध्यक्ष-नितीन कोळी तासखेडा उपाध्यक्ष-सुपडु मोरे थोरगव्हाण उपाध्यक्ष- संतोष पाटील सचिव-राजेंद्र महाले मार्गदर्शक -विजय तावडे ,सहसचिव – ईश्वर तायडे सल्लागार – नितीन सपकाळे प्रसिद्धी प्रमुख – विनोद कोळी  सह प्रसिद्ध प्रमुख-योगेश्वर कोळी,सदस्य-संदेश सपकाळे सदस्य-रविंद्र सपकाळे सदस्य-जयराम कोळी सदस्य – दिलीप कोळी सदस्य-गोपाल कोळी सदस्य-विक्की कोळी सदस्य–मनोहर पु. कोळी

सदस्य-भानु कोळी सदस्य–बंटी कोळी सदस्य–हिरालाल कोळी

अशी समीती गठीत करण्यात आली.त्यावेळी चंद्रकांत कोळी युवा अध्यक्ष, अनिल जैतकर, बादशहा जैतकर, रमेश किंक्राळे, पृथ्वी जैतकर, जितेंद्र टेलर, विजय कोळी, गफ्फुर कोळी,नारायण कोळी,उमेश कोळी आदी वरील सर्व समाज बांधव उपस्थित होते.सुत्रसंचालन मनोहर कोळी यांनी केले तर आभार विनोद कोळी यांनी मानले.

Spread the love