दसऱ्यानंतर राज्याचा दौरा करणार – उद्धव ठाकरे

0
48

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी दसऱ्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.

‘बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याकडे असं म्हटलं जातं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा… आज नवरात्रीमध्येच सुनील महाराज शिवसेनेत आलेय. त्यांच्यासोबत बंजारा समाजाचे कडवट सैनिक लढवैय्या सैनिक सोबत आले आहेत. बंजारा समाज, सेवालाल महाराज यांचे शिष्य असल्याने गद्दारी त्यांच्या रक्तात नाहीए. साहाजिकच आहे शिवसेना म्हटल्यावर माझी जबाबदारी आहे यांचं भवितव्य घडवण्याची. मी आधी सांगितल्याप्रमाणे दसऱ्यानंतर मी राज्यभरात दौरे करणार आहे. पोहरादेवीला जरूर जाईन व भोग देखील चढवणार आहे. तिथून विदर्भात जाईन. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे’, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

‘शिवसेनेचं काय होणार असं विचारलं जातंय पण या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच शिवसेना अनेक पाऊलं पुढे गेलेली आहेत. रोज कुणी ना कुणी मातोश्रीवर येतंय व आमच्यासोबत असल्याचे सांगतोय’, असे उद्धव ठाकरे म्हणाले

यावेळी संजय राठोड यांच्याविषयी पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शह वगैरै गोष्टींवर माझा विश्वास नाही. मला पुढे जायचंय. जे सोबत येतील ते माझे आहेत व लढाईच्यावेळी जे सोबत येतात त्यांचं महत्त्व अधिक असतं. त्याच्यामुळे एवढा मोठा समाज सोबत आल्यावर एखाद्या व्यक्तीला शह देणं ही फारच क्षुल्लक गोष्ट आहे’.

Spread the love