यंदाचा रावण 50 खोक्यांचा खोकासूर आहे; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

0
51

यंदाचा रावण 50 खोक्यांचा खोकासूर आहे; उद्धव ठाकरे

पाकिस्तानचे माजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जाणारे तुमचे नेते, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार

शिवसेना कशी पुढे न्यायची, हिंदुत्व कसे सांभाळायचे, ते आम्हाला शिकवू नका

शिवसैनिक शांत आहेत, त्यांना शांत राहू द्या, त्यांना डिवचू नका

त्यांचे आमदार खुलेआम बंदूक काढतो. चुनचुनके मारेंगे म्हणतात, अशा वेळी कोठे आहे त्यांचा कायदा

आम्ही कायदा पाळायचा आणि त्यांनी डुकरे पाळायची, हे चालणार नाही.

पुन्हा येईन, पुन्हा येईन.. असे म्हणत दीड दिवस आले. नंतर मनावर दगड ठेवत उपमुख्यमंत्री झाले.

देवेंद्र फडणवीस यांना कायद्याचे ज्ञान आहे, ते सभ्य गृहस्थ आहेत. आपण त्यांना टोमणे मारत नाही.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आपल्यात नाहीत, ते त्यांच्या नावाने मते मागत आहेत.

स्वतःच्या बापाच्या नावाने मते मागण्याची ताकद नाही. बाप चोरणारी एवलाद आहे ती..

आपण छत्रपती शिवराय आणि आईवडिलांच्या साक्षीने सांगतो, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरले होते.

अमित शहा बोलले असे काही ठरले नव्हते.

जर आपण हिंदुत्व सोडले असेल तर तुम्हीच सांगा

भाजपने पाठीत वार केला म्हणून आपण महाविकास आघाडी केली होती.

आपल्यावर शस्त्रक्रिया झाली त्यानंतर आपले शरीर निश्चल झाले होते, त्यावेळी कटाप्पा कट करत होते.

आता 50 खोक्यांचा खोकासूर आहे.

या वेळेचा रावण वेगळा आहे. काळ बदलतो तसा रावणही बदलत आहे.

ही गर्दी बघून गद्दारांचे कसे होणार, असा प्रश्न आता पडतो आहे.

ते गद्दार आपण त्यांना गद्दारच म्हणणार, त्यांचा गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही.

तुमचे प्रेम आणि आशिर्वाद याच्या बळावर आपण अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले.

तुमच्या प्रेमामुळे आपण भारावलो आहोत, त्यामुळे बोलायला खूप आहे, पण किती बोलता येईल ,हा प्रश्न आहे.

आपण आजपर्यंत अनेक मेळावे पाहिले पण हा अभूतपूर्व मेळावा आहे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात

शिवसेना मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ.रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचे स्वागत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन

शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या संबोधनाला सुरुवात

हिंदुत्व म्हणजे इतर धर्माचा द्वेष करणे नव्हे

सुषमा अंधारे यांचा बंडखोरांवर हल्लाबोल

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या संबोधनाला सुरुवात

महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवण्याचे काम सुरू आहे.

सध्याचे सरकार मराठी भाषेबाबत उदासीन असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

हे मावळे ठामपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

जमलेले ते मावळे, उडाले ते कावळे ते तुम्हाला माहिती आहेच.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या संबोधनाला सुरुवात

सत्ताधारी पक्षाचे आमदार उघडपणे पिस्तूल काढतात.

शेतकऱ्यांना रडवणारे हे सरकार आहे, फक्त घोषणा होतात, मात्र शेतकऱ्यांना मदत मिळत नाही

शिवसेना ही सर्वसामान्यांची आहे, याचे आपण स्वतः उदाहरण आहोत.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संबोधनाला सुरुवात

शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उत्साहात सुरुवात झाली आहे.

Spread the love