अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली(रजि0) शाखा महाराष्ट्र प्रदेश

0
46

 

चोपडा::अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली(रजि0) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार स्व.कांतीजी कोळी साहेब यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले.साहेबांच्या अश्या अचानक जाण्याने महाराष्ट्रा सह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे,स्व.कांतिभाई कोळी हे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे संस्थापक सदस्य होते त्यांनी संघटनेच्या विस्तारासाठी महाराष्ट्र सह पूर्ण भारत देशात आर्थिक,शारीरिक व बौद्धिक परिश्रम घेतले आहेत, दिल्ली येथील कोळी भवन उभारण्यात साहेबांचे विशेष योगदान व सिंहाचा वाटा होता.

माजी आमदार स्व.कांतिभाई कोळी यांचा आज दिनांक 30/10/2021 रोजी जळगाव येथे श्रद्धांजली पर कार्यक्रम आयोजित केला होता तसेच साहेबांचे स्मृतीपित्यर्थ भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
मा.श्री.परेशभाई कोळी,प्रदेश युवक अध्यक्ष, अखिल भारतीय युवा कोळी समाज नवी दिल्ली(रजि0) यांचे आदेशानुसार तसेच
मा.श्री.सिद्धार्थ दादा कोळी,प्रदेश कार्याध्यक्ष, अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली (रजि0) व
मा.श्री.अनिलदादा देविदास नंन्नवरे, खांदेश विभागीय उपाध्यक्ष तथा खांदेश विभागीय युवक कार्यअध्यक्ष यांचे मार्गदर्शनाने व प्रमुख पुढाकाराने
जळगाव येथील सावखेडा शिवारातील केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री आनंद आश्रमातील(वृद्धाश्रम) आजी बाबांना भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
तसेच चोपडा तालुक्यातील मौजे पांढरी या सातपुड्यातील दुर्गम भागातील खेडे गावातील 125 कुटुंबीयांना फरसाण वाटत करण्यात आले.
यावेळी खांदेश विभागीय उपाध्यक्ष तथा खांदेश विभाग युवक कार्यअध्यक्ष मा.श्री.अनिलदादा नंन्नवरे,
मा.श्री.धनराजभाऊ साळूंके, जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष,
मा.श्री.गोपालजी सोमा बाविस्कर(गुरूजी),कर्मचारी संघटन उपस्थित होते.

Spread the love