विविध कार्यकारी सोसायटी येथे जनरल ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसेवक एम टी बगडे यांनी अजेंडा वाचून MRGS महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना कृती आराखडा व इतर योजनेच्या माहिती दिल्या माजी सदस्य छब्बीर तडवी यांनी सरपंच ग्रामसेवक यांना मागील मिटिंग मध्ये घेतलेल्या समस्या सोडवल्या नाही व आता परत पुढील मिटिंग ला विचार करू असे सांगितले गावात पंधराव्या वित्त योजनेतून झालेल्या कामा बद्दल माहिती विचारली गातील अनुसूचित जाती जमाती चा निधी कुठे कुठे वापरला तसेच अनु जाती वस्थित गटारी दुरुस्थी व नको तिथे कॉक्रेटी करण करण्यात आले 2 महिन्या पासून अंडर ग्राउंड गटार खोदून ठेवली असून अद्याप पर्यन्त तिचे पूर्ण काम केलेले दिसून आले नाही त्या मुळे तेथील महिलांना रात्री शैचास जाण्यास त्रास सहन कराव लागला व त्या खड्यात आदर्श आढाळे हा 17 वर्षाचा मुलगा पडून जखमी झाला त्याच्या पायाला टीच गेली आहे ठेकेदार व ग्रामपंचायत च्या हलगर्जी पणा मुळे जीवित हानी होऊ शकते कामा बद्दल महिला विचारण्यासाठी गेल्या असता त्यांना सरपंच ग्रामसेवक यांनी सांगितले की आम्ही गटार बघायला येतो आणि महिलांना घरी पाठवून स्पॉट वर गेलेच नाही अस्या कारभारामुळे गावाच्या समस्या सुटणार का आणि गावाचा विकास होईल का असा प्रश्न ग्रामस्थांना निर्माण झाला आहे फक्त टक्केवारी द्या काम घ्या अश्या बेजबाबदार ग्रामसेवक ठेकेदारावर कार्यवाही करण्याची मागणी गावातील जनतेत चर्चा चालू आहे तसेच ग्रामसेवक हे वेळेवर येत नाही व्हेटरणरी डॉक्टर उपकेंद्राचे डॉक्टर शिक्षक गावात राहत नाही व वेळेवर येत नाही असे ग्रामस्थांनी विषय मांडले मागील 4 ते 5 महिन्यापूर्वी बाहेरील संस्थे ला महिलांना केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले त्यात पूर्णतः अपहार झाल्याचे ग्रामस्थाची तोंडी तक्रार आहे त्यात एकूण 80 हजार रुपये चा खर्च दाखविण्यात आला आहे त्या संदर्भातील माजी सदस्य छब्बीर तडवी यांनी बिल सादर करण्यास सांगितले असता ग्रामसेवक यांनी कोणतेच दप्तर व बिल दाखविले नाही त्यावर ग्रामस्थ नी नाराजी व्यक्त केली आहे डोंगरदा पाडा येथे तडवी आदिवासी अनु सूचित जाती व जमाती बेघर वाशी यांना ग्रामपंचायत हद्दीतील जागा प्लॉट देण्यात यावी अशी लेखी मागणी केली आहे तसेच अश्या खूप काही समस्या ग्रामपंचायत सोडविन्यास अ समर्थ आहे असे दिसून येतेय अंध दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती झाली आहे

सदर मिटिंग ला सरपंच नवाज तडवी, उपसरपंच, धनंजय पाटील, पोलीस पाटील, राजरत्न आढाळे, सदस्य, दिलीप तायडे, जुम्मा तडवी,आशा आढाळे, डॉ राजेंद्र झांबरे, ईश्वर्या कोलते, शकीला तडवी, शबनम तडवी, रोजगार सेवक डिगंबर खडसे, लुकमान तडवी, मुत्सुफा तडवी हुसेन तडवी, रमजान तडवी,लालचंद झोपे, क्लर्क प्रदीप पाटील, डालू पाटील, तलाठी वशिम तडवी, समाधान तायडे, भीमराव आढाळे, पांडुरंग धनगर, सुपडू तडवी, कांचन तायडे शंकर वारके, उमाकांत पाटील, चेतन पाटील खेमचंद्र पाटील,शरद धनगर, फिरोज तडवी, प्रवीण मेघे रवींद्र आढाळे इतर ग्रामस्थ उपस्थित होते तर इतर ग्रामपंचायत सदस्य यांची सभेला दांडी सूत्रसंचालन दिलीप तायडे यांनी केले तर आभार ग्रामसेवक एम टि बगडे यांनी मानले










