गोजोरे गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्यामुळे गोजोरे गावात चोरी आणि रिकाम्या कामांना आळा बसणार आहे. विशेष म्हणजे गोजोरे गाव एक प्रकारे जंक्शन सेंटर आहे कारण गोजोरे येथून जळगाव , मलकापूर, जामनेर, भुसावळ या गावांकडे जाण्यासाठी एकमेव रस्ते आहेत त्यामुळे परिसरातील कोणत्याही गावात काही घटना घडली तर तपासासाठी गोजोरे येथील सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका पार पाडतील. आधीच गोजोरे गाव सर्व सुविधा निर्माण करत आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे त्यात आता संपूर्ण गोजोरे गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत राहणार असल्याने गोजोरे ग्रामस्थांनी सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन केले आहे. वास्तविक पाहता परिसरातील इतर गावांतील सरपंच व सदस्यांनी गोजोरे गावाचा आदर्श घ्यावा असे बोलले जात आहे.

Spread the love