अरे बापरे ! आंघोळ घालताच ‘काळा’ घोडा ‘लाल’ झाला

0
46

घोडा जितका रुबाबदार तितकीच त्याची किंमत जास्त. गर्द काळ्या रंगाचा घोडय़ाची बात काही औरच. काळ्या रंगाचा घोडा आपल्याकडे असाका यासाठी काहीजण काट्टेल तितकी किंमत मोजायला तयार असतात. काळ्या रंगाचा घोडा खरेदी करण्याची आकड पंजाबमधील रमेश कुमार या क्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. या क्यक्तीने तब्बल 23 लाख रुपये मोजून काळा घोडा खरेदी केला. घरी आणून या घोडय़ाला आंघोळ घालताच तो रंग लाल झाला आणि आपली फसकणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. रमेश हे पंजाबच्या सुनाम शहरातील संगरूरमध्ये राहतात. आपण एका क्यापाऱयाकडून हा घोडा खरेदी केला होता. सौद्यामध्ये तीन लोकांचा सहभाग होता. रोख आणि धनादेश असे मिळून आपण त्यांना 23 लाख रुपये दिल्याचे रमेश यांनी सांगितले. फसकणुकीप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदकली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Spread the love