भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमॄत महोत्सव  निमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा   प्रणित श्री. गुरुदत्त रिक्षा स्टॉप चे उद्घाटन

0
45

15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमॄत महोत्सव निमित नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा प्रणित श्री. गुरुदत्त रिक्षास्टॉप गिरणा पंपींग रोड जळगाव शाखेचे उद्घाटन आमदार मा. सुरेश दामू भोळे (राजु मामा भोळे) यांच्या * हस्ते करण्यात आले .या उद्घाटन समारंभास जलसंपदा मंत्री नामदार श्री. गिरीश भाऊ महाजन खासदार श्री. उन्मेष दादा पाटील यांनी उद्घाटन समारंभाला शुभेच्छा दिल्या उद्घाटन कार्यक्रम

नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आदिवासी कोळी महासंघ प्रल्हाद भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला या उद्घाटन कार्यक्रमात भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष  मा. दिपक भाऊ सुर्यवंशी

भाजपा ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ वाणी , महामंत्री जब्बार शेख सत्तार , रिक्षा युनियन चे नेते देविदास भाऊ भडंगर , सल्लागार सुनील भाऊ जाधव भाजपा हाॅकसऀ आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाकर तायडे टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष गौरव भाऊ उमप यांची प्रमुख उपस्थिती होती .श्री गुरुदत्त रिक्षा स्टॉप चे अध्यक्ष योगेश भाऊ बागडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते

श्री. गुरुदत्त रिक्षा स्टॉप चे अध्यक्ष योगेश बागडे उपाध्यक्ष राहुल वाघ सचिव दिगंबर नेवे सहसचिव राजु सपकाळे खजिनदार नरेश पाटील संघटन सचिव दिपक धनगर, पंकज पालीवाल सल्लागार निलेश अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली

सर्व प्रथम १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार मा. राजु मामा भोळे यांनी भारत माता, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना अभिवादन केले यानंतर रिक्षा स्टॉप च्या नामफलकाचे अनावर करून रिक्षा स्टॉप चे उद्घाटन केले

भारत माता की जय वंदे मातरम्

स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला याठिकाणी देशभक्ती पर गितांवर रिक्षा चालकांच्या मुलांनी नॄत्य सादर केले यादिवशी श्रावण सोमवार चे औचित्याने रिक्षा स्टॉप तर्फे साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली या कार्यक्रमात आमदार

मा. राजु मामा भोळे यांनी रिक्षा स्टॉप उद्घाटनास व सर्व पदाधिकारींचे व रिक्षा चालक मालकांना शुभेच्छा दिल्या व केंद्रातील भाजपा व राज्यातील भाजपा शिवसेना युतीचे शासन ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन चालकांसाठी विविध योजना राबवित आहे शासनाने रिक्षा चालकांसाठी ई-श्रम कार्ड च्या माध्यमातून ५ लाखांचा विमा मोफत दिला जातो आयुष्यमान भारत , शैक्षणिक फायदे , परिवारासह अपघाती विमा व लवकरच महाराष्ट्र शासनाने रिक्षा चालक मालकांच्या विकासासाठी कल्याण कारी महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे  या विविध योजनेचा लाभ सर्व रिक्षा चालकांना मिळावा यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन दिले .यावेळी प्रल्हाद सोनवणे , प्रमोद वाणी, जब्बार शेख, देविदास भडंगर यांनीही विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले

या कार्यक्रमात रिक्षा चालक मालकांचा परिवार ही आवर्जून उपस्थित होता पद्माकर पाटील सुनील चौधरी गंभीर तडवी प्रमोद वाणी कैलास सोनवणे सरफराज तडवी सुरेंद्र सपकाळे जगदीश सुरवाडे साहेबराव चौधरी अजय चौधरी सुभाष चव्हाण रविंद्र चौधरी राजु पाटील अशोक नेवे युवराज भोई विनोद मराठे कृष्णा बोंडे , जितेंद्र पाटील राजु बडगुजर साहेबराव चौधरी

सौ. अनिता नेवे, सविता बोंडे, रंजना पाटील भाग्यश्री कोळी, ज्योती बागडे स्वाती ओतारी सरीता पाटील संगीता सपकाळे मनिषा पाटील ललीता पाटील अर्चना वाघ   रोहित अधारिया युवराज भोई भास्कर चौधरी जयवंत बोदडे नितीन राखपसरे मधुकर राठोड सागर दोणे मिलिंद पाटील कुणाल पाटील यांच्या सह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन कार्यक्रमात ४ रिक्षा स्टॉप पदाधिकाऱ्यांच्या मुलांचे १५ ऑगस्ट रोजी जन्मदिन असल्याने यावेळी आमदार मा. राजु मामा भोळे यांच्या व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन च्या माध्यमातून आम्हा रिक्षा चालकांच्या अडीअडचणी सोडविल्या जातील असा विश्वास रिक्षा स्टॉप अध्यक्ष व पदाधिकार्यांनी व्यक्त केला

 

Spread the love