जळगाव जिल्हा परिषद कुर्हे वराडसीम सुनसगाव गटासाठी श्री अनिल ठाकूर सर (सूनसगाव)यांचे नाव चर्चेत

0
96

मा.राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे पडघम वाजू लागलेले आहेत नुकताच त्याचा एक टप्पा म्हणून गट आणि गणांचे आरक्षण सुद्धा जाहीर झाले या आरक्षणांनी अनेकांना धक्का दिला तर अनेकांना सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे 

त्यानुसारच भुसावळ तालुक्यातील एक महत्त्वाचा गट म्हणून ओळखला जाणाऱ्या कुर्हे प्र न वराडसीम सुनसगाव गट हा अनुसूचित जमाती अर्थात एसटी करता राखीव झाल्याने या गटातील सूनसगाव गावाचे रहिवासी तथा माध्यमिक शिक्षक श्री अनिल ठाकूर सर यांचे नाव चर्चेत आले आहे या गटातुन आत्तापर्यंत विश्वनाथ पाटील पल्लवी सावकारे यासारख्या अनेक दिग्गजांनी प्रतिनिधित्व केल्याने या गटास जिल्हा परिषदेत एक महत्त्वाची ओळख आहे दरम्यान श्री ठाकूर यांचा परिवार सुनसगाव येथील शिक्षित सुसंस्कृत व सामाजिक उपक्रमात भाग घेणारा परिवार असल्याने त्यांच्या नावाची चर्चा परिसरात सुरू झाल्याचे दिसते श्री ठाकूर यांच्या निमित्ताने सूनसगाव गावाला प्रथमच जिल्हा परिषद सदस्या साठी एक उत्तम संधी चालून आल्याचे गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे

दरम्यान येत्या काळात कुठला पक्ष काय भूमिका घेतो यावर आगामी चित्र अधिक स्पष्ट होईल

Spread the love