राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कश्मीर फाईल्स या चित्रपटावर टीका केली असून या चित्रपटाद्वारे खोटा प्रपोगंडा पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या चित्रपटाच्या आधारे देशातील वातावरण विषारी केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. दिल्लीत एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
”अशा चित्रपटांना स्क्रिनिंगला परवानगीच दिली गेली नाही पाहिजे. असे असतानाच त्यांना कर मुक्ती दिली जात आहे. ज्यांनी देशाला एकत्र ठेवले पाहिजे ते सर्वांना हा चित्रपट पाहायला प्रोत्साहित करत आहेत. याने लोकांमध्ये राग निर्माण होईल. या चित्रपटाद्वारे देशात खोटं पसरवलं जात आहे. त्यामुळे देशातील वातावरण खराब होतंय”, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.











