माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जिवाला धोका,,,

0
45

अधिकारी सचिन वाजेच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती तळोजा जेल प्रशासनाने आज मुंबई सत्र न्यायालयात दिली आहे. सचिन वाजेंनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करत आपल्याला सुनावणी दरम्यान कोर्टात आणला जात नाही.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत त्यांना कोर्टात हजर केले जाते, असे म्हटले होते. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फतही हजर होत नाही. वाजे यांनी केलेल्या आरोप संदर्भात जेल प्रशासनाने वाजे यांच्या जीवाला धोका असल्याचे आपल्या उत्तरात कोर्टाला सांगितले आहे. वाजे हे दोन महत्त्वाच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनले असल्याने त्यांना धोका असल्याचे जेल प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र वाजे यांना 18 ऑगस्ट रोजी सुनावणी दरम्यान कोर्टात आणला जाणार असल्याची माहिती मिळते.

Spread the love