मालोद येथील मुख्याध्यापिका जहानुर अमिरखा तडवी सेवानिवृत्त

0
42

यावल प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – येथील जि. प. प्राथमिक शाळा येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका श्रीमती जहानुर अमिरखा तडवी या 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्या.

त्यांची 36 वर्षे सेवा झाली. त्यांचा सत्कार ग्रामपंचायत प्रशासक श्री.हबीब तडवी (ग्रामविस्तार अधिकारी) तसेच शाळेतील शिक्षक, परिवार व विद्यार्थ्यांनी यांनी निरोप देतांना केला. तसेच या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत प्रशासक श्री. हबीब तडवी, ग्रामसेवक राजू तडवी, शिक्षक जितू आराक सर, अनिल तडवी सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नबाब तडवी,शिक्षणतज्ञ समीर तडवी , शासकीय आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, तलाठी, त्यांचा परिवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love