ममुराबाद -:कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव अंतर्गत ऑनलाइन शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले . जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर,सहाय्यक महाप्रबंधक (नाबार्ड)श्रीकांत झांबरे हे प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, जळगाव हे उपस्थित होते.
प्रशिक्षणाला 75 पेक्षा अधिक शेतकरी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.कार्यक्रम समन्वयक डॉ.हेमंत बाहेती यांनी प्रास्ताविक केले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. शामकांत पाटील यांनी पशुधनामधे रोग ,लसीकरणाचे महत्व, फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन तसेच आभार विषय विशेषज्ञ किरण मांडवडे यांनी केले.











