पैठण कारागृहातुन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडून अटक

0
47

जळगाव – :मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत गवळी यांनी मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना जळगाव जिल्ह्यातील कोवीड 19 चे आकस्मिक अभिवचन रजेवरुन फरार बंदी कैदीना अटक करणे बाबत आदेश दिले होते. त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पोह जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोना नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे, विजय पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.

मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बंदी कैदी शेख इसा शेख पिरण, वय 40, रा. शिवाजी नगर जळगाव हा जिल्हा मध्यवर्ती खुले पैठण कारागृह येथे खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असतांना बंदी कैदी हा आकस्मिक कोवीड 19 च्या रजेवर जळगाव शहरात आला असून तो वेळेत हजर न झाल्याने त्याचे विरुध्द जळगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये 225 / 2022 भादवि कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या फरार शिक्षा बंदी कैदी शेख इसा शेख पिरण, वय 40, रा.शिवाजी नगर जळगाव हा त्याची ओळख लपवून ट्रान्सपोर्ट नगर मधील गाडयावर काम करीत असल्याची बातमी मिळाल्यावरून वरील पथकाने त्यास ताब्यात घेवून वैद्यकिय तपासणी करून पुढील कारवाई करीता जळगाव शहर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.

Spread the love