पुण्यातील संतापजनक घटना : वडील आणि भावाकडून ११ वर्षीय मुलीवर बलात्कार ; आजोबा आणि चुलत मामाकडून झाला विनयभंग

0
49

पुण्यातील विविध शाळा, महाविद्यालमध्ये गुड टच अ‍ॅण्ड बॅड टच संदर्भात व्याख्यानं घेण्यात येत आहेत. त्यातून अनेक घटना समोर येत असताना, अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील ११ वर्षीय मुलीला मागील सहा वर्षांपासून वडील, भाऊ, आजोबा आणि चुलत मामा यांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याचे तिने स्वत: सांगितले आहे. या मुलीवर वडील आणि भावाने बलात्कार केला असून आजोबा आणि चुलत मामाकडून विनयभंग झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या गुन्हे निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयमध्ये ‘गुड टच अ‍ॅण्ड बॅड टच’ बद्दल मुलींना माहिती दिली जाते. दरम्यान पुण्यातील एका भागाती शाळेत देखील हे व्याख्यान झाले, यावेळी एका ११ वर्षीय मुलीने उपस्थित समुपदेशक आणि शिक्षकांना मागील सहा वर्षांपासून विविध ठिकाणी तिच्यावर वडील, भाऊ यांच्याकडून बलात्कार करण्यात आल्याचे आणि आजोबा आणि चुलत मामाकडून विनयभंग झाल्याचे सांगितले.

हे सर्वजण तिला भीती दाखवून अत्याचार करीत असल्याचे पीडित मुलीने सांगितले आहे. तसेच या प्रकरणी पीडितेच्या भावाला अटक करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love