संभाजीनगर येथील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सभेला भोकर तालुक्यातुन शेकडो शिवसैनिक जाणार- तालुकाप्रमुख अमोल पवार

0
46

भोकर दि८जून रोजी शिवसेना संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला संपूर्ण मराठवाड्यातून लाखोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. आगामी होऊ घातलेल्या महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात पक्षप्रमुख काय आदेश देणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे, तर हिंदुत्वावर आणि संभाजीनगर च्या नामांतरावर तसेच भाजपच्या ढोंगी राजकारणावर मुख्यमंत्री काय बोलतील याकडे संपूर्ण महाराष्ट्रासाहित देशाचे लक्ष लागलेलं आहे ,त्यामुळे या सभेला अतिमहत्व प्राप्त झालेलं आहे. ही सभा ऐतिहासिक ठरण्यासाठी शिवसैनिकांनी चंग बांधलेला आहे, त्याच अनुषंगाने भोकर तालुक्यातुन ही जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिकांनी या सभेला उपस्थित राहावे अशी विनंती तालुकाप्रमुख अमोल पवार यांनी केली आहे, त्याच बरोबर तालुकाप्रमुख अमोल पवार यांच्यासोबत उपतालुकाप्रमुख बालाजी येलपे डौरकर, तालुका संघटक नारायणराव पाटील पोमनाळकर,युवासेना तालुकाधिकारी स्वप्नील रेड्डी, नंदू पाटील कौठेकर, सर्कलप्रमुख राजु पोगरे, शाखाप्रमुख निखिल डुरे, गणेश आरलवाड, साईनाथ गादेपवाड,गुजराल सूर्यवंशी, लक्ष्मण इरलोड, उपशहरप्रमुख श्याम वानखेडे, युवसैनिक राहुल कोंडलवार, आनंद पा. जाधव हासापुरकर, कृष्णा कोंडलवार सह शेकडो शिवसैनिक संभाजीनगर येथील सभेला जाणार आहेत अशी माहिती तालुकाप्रमुख अमोल पवार यांनी दिली.

Spread the love