तळोदा – दिनांक 31 मे 2022 हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस निमित्त सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे व्यसन मुक्ती जनजागृती करण्यात आली यावेळी गोपाळपूर पुनर्वसन या गावात तरुण पुढे व्यसनमुक्ती या विषयावरती चर्चा करून यावर सर्वांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळेस प्रतिज्ञेत म्हटलं की, मी प्रतिज्ञा करतो की मी कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या सेवन करणार नाही. नाही आपल्या कोणत्याही ओळखीच्या व्यक्तींना हे करण्यासाठी सांगणार. मी व्यसनाच्या व्यवसाय करणाऱ्याचा विरोध करेल. स्वच्छ आरोग्यदायी समाजाच्या निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. मी आपले घर,परिवार,शेजारी,मित्र मंडळी यांच्या व्यसनापासून दूर करण्याची प्रत्येक प्रकारचे प्रयत्न करणार. प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीर आत्मा व देशाचे रक्षण साठी व्यसनाचे त्याग करून चांगला मार्गावर चालणे पाहिजे. अशा प्रकारची प्रतिज्ञा सर्व तरुणांकडून घेण्यात आली.

यावेळेस सेवाभावे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री.उमेश भैय्या सोनवणे हे म्हटले की,व्यसनाधिनतेमुळे होणारी जीवहानी दिवसेंदिवस वाढते आहे. व्यसनामुळे होणाऱ्या आजारांसाठी शरीराची माणसाची खूप मोठी हानी होते. आजच्या तरुण कोठेतरी व्यसनाधीन आहे.या तरुणाला व्यसना यापासून दूर करण्याची अत्यंत गरज आहे. यासाठी सेवाभावे प्रतिष्ठाने अशा प्रकारची जनजागृती करत आहे.
यावेळी गोपाळपूर पुनर्वसन चे श्री.अशोक पावरा यांनी आपल्या आदिवासी बोली भाषेत म्हणाले की, व्यसनामुळे घराचे घर उद्ध्वस्त होत आहे. आज तरुण मंडळी हे व्यसनाधीन होत आहे या विषयी सेवाभावे प्रतिष्ठान हे जनजागृती अभियान सुरू केला आहे ते अभियान अत्यंत मोलाचे महत्त्वाचे आहेत.
या दिवसाचे औचित्य साधून सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे आयोजित ऑनलाईन व्यसनमुक्ती जनजागृती अभियान प्रश्नमंजुषा घेण्यात आली. या अभियानात ज्यांनी सहभाग घेतला त्यांना प्रमाणपत्र देऊन व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. या ऑनलाईन प्रश्नमंजुषा शंभरहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम करत असते. संस्थेमार्फत नंदुरबार जिल्ह्यातील 10 गावांमध्ये स्मार्ट विलेज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गाव हे समृद्ध होऊन स्वावलंबी व्हावे अशी संस्थेची काम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी गोपाळपूर पुनर्वसन येथे व्यसनमुक्ती जनजागृती मिशनमध्ये “संस्कार,संस्कृती विसरू नका तंबाखू साठी हात पसरू नका” घोषणा देऊन श्री.जोरदार पावरा,श्री.सुखराम पावरा, श्री.केशव पावरा,श्री.दिलदार पावरा,श्री.अशोक पावरा,श्री.अंकित पावरा,श्री.दीलवर पावरा,श्री.लालसिंग पावरा,श्री.अशोक पावरा,श्री.सुभान पावरा,श्री.इस्माईल पावरा,श्री.संजय पावरा यांनी प्रतिज्ञा घेतली.

या कार्यक्रमासाठी सेवाभावे प्रतिष्ठानाचे उपाध्यक्ष श्री.सागर पाटील,सचिव सौ.कविता कलाल,कार्याध्यक्ष श्री.संतोष चौधरी संचालक श्री.नकुल ठाकरे श्री.अतुल पाटील, श्री अनिल नाईक,श्री.चंभूलाल ठाकरे, श्री.सुरसिंग नाईक,श्री रोहन गुरव यांनी परिश्रम घेतले











