प्रतिनिधि भोकर – दत्ता बोईनवाड
भोकर – तालुक्यातील सध्या ठाकरे कुटुंबीय व शिवसेनेवर शिवसेनेच्याच गद्दार लोकांनी भाजपच्या संगमताने शिवसेना उध्दवस्त करण्याचा बेत आखल्याने शिवसैनीकांत प्रचंड रोष गद्दाराविरुद्ध असुन यामुळे स्व.बाळासाहेब ठाकरे व पक्ष प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांना समर्थन म्हणून भोकर तालुक्यातील असंख्य शिवसैनिक मातोश्रीवर जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
भोकर तालुक्यातील सर्व शिवसैनिक मुळ शिवसेना म्हणजे मा.पक्षप्रमुख मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असुन साहेब तमाम शिवसैनीक आपल्या पाठीशी आहोत साहेब गद्दारासी सामना करण्यासाठी तळागाळातील बाळासाहेब व तुम्हाला माणसाला शिवसैनीक आपल्या पाठीशी आहे.व आम्ही एकसंघ शिवसेनेचे आहोत अशी प्रतीज्ञा करत भोकर तालुक्यातील शिवसैनिक उध्दवजी ठाकरे व अदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईला दि.२२ रोजी रवाना झाले असून यात मार्केट कमिटीचे संचालक तथा माजी सेना तालुका प्रमुख सतीष देशमुख, जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर,जि.प.सदस्य सुनील चव्हाण, चेअरमन गंगाधर महादावाड, महानगर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, तालुका संघटक साहेबराव पाटील भोंबे, माजी तालुका प्रमुख प्रदीप दौलतदार,स़ंघटक सुनील जाधव, उप तालुका प्रमुख वामन महाराज, सर्कल प्रमुख रमेश महागावकर,गट प्रमुख मारोती पवार,से.स.सो.सदस्य बाबुराव खोदानपुरे,शाखा प्रमुख साहेब वाकोडे,संजय चिकटे, गंगाधर तुराटीकर,नागभुषण गायकवाड,सर्कल प्रमुख राजेश पोगरे,अक्षय शिंदे,शाखा प्रमुख रामेश्वर वाघाळे, लक्ष्मण दादा कोरडे आदी शिवसैनिक मुंबई कडे रवाना झाले आहे.











