वणी येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर दीड महिन्यासाठी बंद

0
53

वणी येथील सप्तशृंगी देवीचे  दर्शन घेण्यासाठी जात असाल तर ही बातमी नक्की वाचा.

उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवी मंदिराची दुरुस्ती तसेच गर्भगृहाला चांदीचा पत्रा बसविण्याच्या कामासाठी दिनांक २१जुलै ते ५ सप्टेंबर या ४५ दिवसांच्या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.

भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये म्हणून मंदिराच्या पहिल्या पायरीजवळील सप्तशृंगी देवीची हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या पर्याय दर्शनाची व्यवस्था म्हणून ठेवली जाणार आहे, अशी माहिती विश्वस्त ऍड. दीपक पाटोदकर यांनी दिली.

Spread the love