यावल तालुक्यात लंपी स्किन डीसेज या गुरांवरील संसर्गजन्य आजारावर नियंत्रण आणावे शेतकऱ्यांना भरपाई द्यावी : शिवसेनेची मागणी

0
50

यावल – तालुक्यात मोठया प्रमाणावर गुराढोरांवर आलेल्या लपी स्किन डिसेज या गंभीर संसर्गजन्य आजाराने शेतकऱ्यांची अनेक गुरढोर मरण पावली असून, या संदर्भात प्रशासनाने तात्काळ उपाय योजना आखून गुराढोरांचे मोफत लसीकरण करून त्यां शेतकऱ्यांचे गुरढोर मरण पावलेले आहेत त्यांना तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे एकाने निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. या संदर्भात शिवसेना च्या वतीने यावल चे तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या मागणी निवेदनात म्हटले आहे की सध्या यावल शहर व तालुक्यात गुरांवर आलेल्या लंपी स्किन डिशेज या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत असून या आजारामुळे शेतकरी संकटात सापडला असून अनेक शेतकऱ्यांचे गुरढोर मरण पावली असून दरम्यान संसर्गजन्य आजार हा गुरांमध्ये अत्यंत वेगाने पसरत असून यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे तरी हा संसर्गजन्य रोग पसरू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाय योजना आखावी तसेच या शेतकऱ्यांचे गुर या संसर्गजन्य आजाराने मरण पावली आहे त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेने चे यावल तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे व यावल शहर शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, यावल शहर उपप्रमुख संतोष खर्चे ,सारंग बेहडे, योगेश चौधरी , मयुर खर्च, हेमंत पाटील , सुरेश कुंभार , सागर देवांग , पिंटू कुंभार, विवेक अडकमोल आधी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत

Spread the love