युवा नेते शुभम पाटील यांचा ‘माझं गाव, माझा अभिमान ‘उपक्रमा अंर्तगत स्वातंत्र्य निमित्त केले शालेय साहित्याचे वाटप

0
52

प्रतिनिधी राजेंद्र महाले

रावेर –  तालुक्यातील थेरोळा येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतेच स्वातंत्र्य दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शुभम पाटील यांनी उपक्रम राबविला     स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव सर्व स्तरातून वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला यातच थेरोळा येथील जि प शाळेत युवा नेते शुभम पाटील यांनी हा उपक्रम शैक्षणिक साहित्य वाटून अनोख्या पद्धतीने साजरा केला जि प शाळेतील गरजू विद्यार्थ्यांची गरज भागवण्या साठी व गावाच्या शैक्षणिक उन्नतीचा आलेख उंचावला पाहिजे या उदात्त हेतूने शुभम पाटील यांनी रावेर तालुक्यातील थेरोळा येथील जि प शाळेत वह्या, पेन, रबर व अन्य शैक्षणिक साहित्य वाटून स्वातंत्र्य दिन अनोखा रीतीने साजरा केला. या वेळी सरपंच मंगला कुलकर्णी , जि प शिक्षक पुंडलिक पाटील ,विजय पाटील ,वसंत पाटील ,महेंद्र लोंढे ग्रामस्थ भागवत हरी पाटील ,प्रमोद शामराव पाटील ,जिजाबाई प्रभाकर पाटील ,माणिक चुडामण पाटील ,निवृत्ती गुलाब पाटील , डॉ पवन पटील, स्वप्नील पाटील ,हेमंत पाटील ,संकेत पाटील ,पुष्पक पाटील ,मयूर पाटील उपस्थित होते.

Spread the love