तोकडे कपडे घातल्याने समस्या निर्माण होतात, गृहमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

0
40

महिलांनी तोकडे कपडे घालणं ही युरोपीय परंपरा असून असे कपडे घातल्याने समस्या निर्माण होतात, असं वक्तव्यं तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद मेहमूद अली यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्याने वाद उद्भवण्याची चिन्हं आहेत.

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे संतोषनगर मधील एका महाविद्यालयात परीक्षा सुरू होत्या. त्या दरम्यान ज्या विद्यार्थिनी बुरखा घालून परीक्षेला आल्या होत्या, त्यांना परीक्षेपूर्वी बुरखा काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावर काही माध्यमांनी तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद मेहमूद अली यांना प्रश्न विचारले. त्यावेळी ते म्हणाले की, असं कुठेही लिहिलेलं नाही की बुरखा घालू शकत नाहीत. जर त्यांना बुरखा काढायला लावला असेल तर त्यावर कारवाई केली जाईल, असं ते यावेळी म्हणाले.

 

पण बुरख्यावरून विचारलेल्या प्रश्नावर आणखीही पुस्ती जोडत अली पुढे म्हणाले की, महिलांनी युरोपीय शैलीचे कपडे घालू नयेत. महिलांनी तोकडे कपडे घातल्यावर समस्या निर्माण होतात. तुम्ही जे हवं ते घालू शकता, पण युरोपीय पद्धतीचे कपडे घालू नका. प्रत्येक धर्माचा एखादा पोशाख असतो, जर तुम्ही हिंदू असाल तर तसे कपडे घाला, मुस्लीम असाल तर त्यानुसार पोशाख करा. हे कपडे उत्तम आहेत, असं अली यावेळी म्हणाले.

या विधानावरून अली यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अशा प्रकारची मानसिकता नक्की काय दर्शवते, असा सवाल नेटकरी अली यांना विचारत आहेत. तसंच बुरखा हा नेमक्या कोणत्या खंडातील पोशाख आहे, जो अनिवार्य केला जातो, असंही नेटकरी विचारत आहेत.

Spread the love