वडती ग्रा.पं. व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व आजी माजी आमदारांचे जल्लोषाने स्वागत !

0
58

हेमकांत गायकवाड

 

चोपडा – विष्णापूर आदीवासी आश्रमशाळा इमारत भूमिपूजन सोहळ्याचा निमित्ताने कार्यक्रमाला जात असता वडती ग्रामपंचायतीच्या वतीने व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांंनी त्यांचे मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने स्वागत केले.

पालकमंत्री गुलाबरावजी पाटील , आ. सौ.लताताई सोनवणे, व माजी आ. चन्द्रकांत आण्णा सोनवणे उपस्थितीत भुमिपूजन होते. कार्यक्रम सोहऴ्यासाठी ठरल्या वेळेनुसार दि.५ सप्टेंबर रोजी ११: ०० आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जातांना वडती येथे शिवसैनिकांनी गावात स्वागताची तयारी करून ठेवली होती. रस्त्यालगत स्वागत गेट , बँनर व ध्वज चौकात व रस्ते सजवून

भगवा शिवशाहीमय वातावरण निर्माण करून टाकले होते.

पालकमंत्र्यांचे गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्वागत सभारंभ ग्रामपंचायत च्या कार्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात आला. प्रथम पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे स्वागत, शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ. मनिषा संजय भिल्ल यांनी व सुनिल शांताराम सपकाळे यांनी केले तर आ. सौ लताताई सोनवणे यांचे स्वागत ग्रा. पं. सदस्य जयश्री सुनिल सपकाळे यांनी तर माजी आ. चन्द्रकांत आण्णा सोनवणे यांचे स्वागत ग्रा. पं. सदस्य रविन्द्र तानकू धनगर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत चे उपसरपंच सदस्या, सदस्य व ग्रामसेवक नरेन्द्र शिरसाठ व जेष्ठ नागरीकांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री गुलाबरावजी पाटील यांचे स्वागत शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांकडून सामुहीक रित्या पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. स्वागतसमयी रविन्द्र पाटील , सुनिल सपकाळे , सुरेश पाटील, घनशाम कोळी , भगवान कोळी, छोटू सोनार, विजय धनगर , गणेश धनगर,

किरन कोळी, सागर कोळी, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी विकास कामांच्या मागणी करीता पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहेत.

Spread the love