ना धक्काबुक्की,ना वशीला, शिस्तीत झाले लसीकरण सुमारे 2600 नागरिकांनी घेतला कोविशिल्ड लसीचा डोस ग्रामपंचायतीच्या संकल्पनेतून गौरव सोनवणे व सहकार्‍यांनी केले होते शिस्तबद्ध नियोजन

0
90

विशाल सोनवणे

कानळदा — कोरोना मुक्त समाजासाठी लसीकरण करण्याचा शासन प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. मात्र शासनाच्या कुठल्याही योजनेत एखादी सामाजिक संघटना,सामाजिक कार्यकर्ता सहभागी होतो. तेव्हा अशा पद्धतीचा उपक्रम जनतेपर्यंत पोहचण्यात अधिकाधीक बळ मिळते. हा अनुभव पाहता शनिवारी 04/09/2021 ग्रामपंचायतीच्या संकल्पनेतून कानळदा परिसरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आबालवृद्ध, ज्येष्ठ-श्रेष्ठ, तरुण-तरुणी विद्यार्थी यांना हजारो कोविशिल्ड लसीकरणाचा डोस उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील हा प्रभाग पहिला 100% लस युक्त, कोरोनामुक्त प्रभाग ठरणार आहे. शनिवारी 04/09/2021 या शिस्तबद्द लसीकरण कार्यक्रमाची जळगाव तालुक्यात जोरदार चर्चा झाली.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना महामारी मुळे समाजात मोठी धास्ती निर्माण झाली होती. आपल्या जवळच्या आप्तेष्ट, नातेवाईक तर परिवारातील सदस्यांचे कोरोना महामारीत निधन झाले. यासाठी केंद्र सरकारने मोठया प्रमाणात लसीकरण मोहीम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात गल्ली ते दिल्ली पर्यंत लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

ना धक्काबुक्की ना वशिला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण झाल्याने या लसीकरण कार्यक्रमाची सर्वाधिक चर्चा झाली

Spread the love