मणिपूरची घटना निर्भया पेक्षा अधिक लज्जास्पद जयसिंग वाघ

0
75

जळगाव – १६ डिसेंबर २०१२ ला भारतात निर्भया हत्याकांड घडल्या नंतर काही तासातच सारा भारत पेटून उठला, केंद्र सरकार प्रचंड हादरले, सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली, मात्र या घटनेपेक्षा कितीतरी पटिने अधिक लज्जास्पद, घृणास्पद, मानवतेला व देशाला कलंकित करणारी घटना मणिपूर येथे दोन आदिवासी महिलां सोबत घडते ७५ दिवस त्याचा कुणालाच मागमुस लागत नाही ही बाब सर्वच दृष्टीने लज्जास्पद आहे असे रोखठोक विचार प्रसिद्ध साहित्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.

सत्यशोधक विद्यार्थि संघटने तर्फे जळगाव येथील काव्यरत्नावली चौकात आयोजित निदर्शने व निषेध सभेत वाघ बोलत होते. पाऊस सुरु असतांना सुद्धा लोक मोठ्या संख्येने हजर होते.
जयसिंग वाघ यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, मणिपूरला जळते ठेवून प्रधानमंत्री परदेशात हार तुरे स्विकारत होते त्यांचे असे वागणे मानवताद्रोही असून लोकशाहिला काळीमा फासणारे आहे, मणिपूर मध्ये ८५ दिवसात सुमारे ३०० लोक मारले गेले,  १५०० च्या जवळपास लोक जखमी झाले , अर्थव्यवस्था मोडकळीस आली , जनता भयभीत व असुरक्षित झाली आहे , ही परिश्थिति लक्षात घेता तिथं राष्ट्रपति राजवट लावली जावी अशी मागणीही वाघ यांनी केली.

मुकुंद सपकाळे यांनी मणिपूरची घटना म्हणजे लोकशाहीची हत्या आहे.  ती घटना सर्व मानवतेला काळीमा फासणारी आहे. समस्त स्त्री वर्गाची विटंबना असून त्याचा निषेध करावा तेवढे थोडेच आहे या प्रश्नी सर्व भारतियांनी एक दिलाने एकत्र येवून संघर्ष करावा तसेच तिथल्या मुख्यमंत्री व केंद्रीय गृह मंत्री यांनी राजीनामा द्यावा असे विचार व्यक्त केले.

डॉ. करीम सालार यांनी मणिपूर येथील महिलांची जी विटंबना करण्यात आली , जी जीवित व वित्तीय हानी करण्यात आली ती भारतीय परंपरेला काळीमा फासनारी आहे, तिथं कायदा व सुव्यवस्था काहीच शिल्लक राहिली नसून तिथं राष्ट्रपति राजवट शिवाय दूसरा पर्यायच नाही असे सांगितले.
या प्रसंगी प्रा. देवेंद्र इंगळे, प्रा. सी. पी. लभा ने, प्रा. जयंत मगर , प्रा. कॄष्णा वळवी, प्रा. साहेब पडालवार , प्रा. गणपत धुमाळे, प्रा. जयेश पाडवी, प्रा. वकार शेख, सचिन धांडे, फाहिम पटेल, सुधाकर पाटील, सुष्मिता भालेराव, भरत कार्डिले , अविनाश तायड़े, नेहा पाटील, स्वप्निल गायकवाड़, अजय पाटील, शरद सोनवणे, नेहा पवार, केतन शिरतुरे, चंचल धांडे, जयेश सोलंके , वैशाली कोळी, प्रतीक झनके, मुकेश राढोड, संघपाल डोंगरे सह विदयर्थी मोठ्याप्रमाणात हजर होते.
निषेध सभे नंतर मुकुंद सपकाळे यांनी प्रधानमंत्री, गृहमंत्री यांच्या विरोधात तसेच संविधान व लोकशाही समर्थनार्थ घोषणा दिल्या त्या नंतर मणिपूर घटनेच्या विरोधात सह्या घेण्यात आल्या.

Spread the love