प्रतिनिधी – उध्दव मामडे
उमरी:- तालुक्यातील गोदापत्रातून अवैधरित्या रेती उपसा करून, वाहतूक करण्याचा गोरख धंदा जोमात चालू आहे. दिवसाढवळ्या शेकडो हायवा टिप्पर सर्रासपणे रेतीची वाहतूक करत असतात. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी नव्याने रुजू झालेले नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉ. निलाभ रोहन यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने उमरी येथील पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्या पथकाने अवेध्य रेती वाहतूक करणारे टिप्पर ताब्यात घेऊन जप्त केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक सचिन आरमाळ हे रात्रीची गस्त घालत असताना, कोडगाव येथून बळेगाव कडे अवैधरित्या रेती घेऊन जात असलेले टिप्पर क्रमांक एम एच २६/एक डी -९३५५ आढळून आले. त्यास ताब्यात घेऊन टिप्पर ड्रायव्हर सदानंद परशुराम लंगोटे यास अटक करून रेती सह टिप्पर असा सहा लक्ष दहा हजार रुपयांच मुद्देमाल जप्त केला आहे. उमरी तालुक्यात अवैध रेती उपसा व गुटखा, जुगार , मटका, असे अनेक अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अवेध्य धंदे करणार्यावर यापुढेही अशीच कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी दिला आहे.












