महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त विजयराव सोनवणे यांना ‘आदर्श शेतकरी’ पुरस्कार

0
3

तळोदा, दि. १ जुलै : महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त तळोदा येथे कृषी विभाग व ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रगत व नाविन्यपूर्ण शेतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री. विजयराव सोनवणे यांचा ‘आदर्श शेतकरी’ म्हणून सन्मान करण्यात आला.

उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी लदिमा तिवारी मॅडम यांच्या हस्ते श्री. विजयराव सोनवणे यांना वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तहसीलदारश्री दीपक दिवरे साहेब, गटविकास अधिकारी के एम पावरा ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष कीर्ती कुमार शहा तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी मॅडम, कृषी विज्ञान केंद्राचे नंदुरबार शास्त्रज्ञ पद्माकर कुंदे व गुडवे सर तळोदा नगरपालिका मुख्य अधिकारी जगदाळे साहेब तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

श्री. विजयराव सोनवणे यांनी आपल्या शेतात पपई, मिरची, केळी व टरबूज यांसारख्या विविध पिकांची आधुनिक पद्धतीने लागवड करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच सेंद्रिय शेती, गोसंवर्धन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि इतर शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या कार्यामुळे ते परिसरातील प्रगत, अभ्यासू व प्रेरणादायी शेतकरी म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त त्यांचा ‘आदर्श शेतकरी’ म्हणून गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातही कृषी क्षेत्रात असेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love