असोदा, ममुराबाद येथे पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली.
ममुराबाद -: गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जळगाव तालुका पोलिस ठाणे हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक, नयन पाटील,कल्याण-कसार, यांच्या मार्गदर्शना खाली असोदा, ममुराबाद, कानळदा, आव्हाने, येथे पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली.
या वेळी तीस पोलिस कर्मचारी यांनी रूट मार्च मध्ये सहभाग नोंदविला.
ममुराबाद येथे घेतली शांतता कमिटीची बैठक .आगामी काळातील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गावकामगार पोलिस पाटील, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या बैठकीचे ममुराबाद येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी कांही सुचना दिल्या.
त्यात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळाने स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, कोरोना च्या अनुषंगाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, एक गाव एक गणपती ही संकल्पना जास्तीत जास्त राबविण्यात यावी, गणेश मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी 4 व घरगुती साठी 2 फुटाची असावी, सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्या विषयीचे उपक्रम राबवावेत, स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियम व तरतुदीचे काटेकोर पालन करावे.
श्री चे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये, गणेशोत्सव मंडळा तर्फे आक्षेपार्ह देखावे, शुभेच्छा फलक लावण्यात येऊ नयेत, बाबत दक्षता घेण्यात यावी. जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे व त्यावर होणारे वाद याबाबत वेळीच कारवाई करण्यात येणारअसल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतुदी व ध्वनी पातळीच्या मर्यादे बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्या वर योग्य ती कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत, पुढील आठवड्यापासून ज्यांच्यावर दोन व दोन पेक्षा जादा गुन्हे दाखल आहेत अशांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठा कडे मंजुरी साठी पाठविण्यात येणार आहेत.
यावेळी ममुराबाद येथील ग्रामपंचायत सरपंच हेमंत चौधरी, पोलीस पाटील आशा पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, विलास सोनवणे, शैलेश पाटील, गोपाळकृष्ण मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर सावळे, महेश अत्तरदे, दिलीप सावळे,मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष नासिर शेख, ग्रामस्थ महेश चौधरी, हिमांशू तिवारी, राजेंद्र शिंदे,गोरख सोनवणे, धनराज पाटील,विजय सोनवणे, मयूर चौधरी, पंकज गुरव,गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.












