विशाल सोनवणे
यावल -हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 1974 रोजी झालेला असून 1974 आठवण म्हणून स्वराज्य ध्वजाची उंची 74 मीटर ठेवण्यात आलेली आहे स्वराज्य ध्वज हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील सर्वात उंच ध्वज “स्वराज्य ध्वज” यात्रा उभारणार आहे. कर्जत येथील आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्वराज्य ध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हिंदुस्थानाला धर्माचे महत्त्व पटवून देण्यासाठी तथा युवकांमध्ये धर्म जनजागृती व्हावी म्हणून तथा धर्माचे रक्षण व्हावे म्हणून एकूण 37 दिवस या ध्वजाचे भ्रमण जवळजवळ सहा राज्यांमधून 12 हजार किलोमीटर प्रवास करून दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर या ध्वजाचे उभारणी करण्यात येईल.
यावल या शहरांमधून स्वराज्य ध्वज यात्रेचे स्वागत करताना
राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रा. श्री मुकेश येवले सर यांचे हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवर श्री अमोल दुसाने. श्री अरुण लोखण्डे.शेख गणी .बापू जासूद.डॉ हेमंत येवले श्री बोदडे नाना व इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्तित होते.












