यावलच्या फालक नगर परिसरातील गटारीचे बांधकाम होत नसल्याने दृंर्गधीयुक्त पाणीचे व घाणीचे साम्राज्य नागरीकांमध्ये भिती नगर परिषाद वर नाराजी

0
56

दिपक नेवे

यावल येथील शहरातील विस्तारित वसाहतीमधील फालक नगर या परिसरातील डेंग्युच्या आजारामुळे एका तरुणाचा मृत्यु झाल्याने परिसरात नागरीकांमध्ये आरोग्याला घेवुन भितीचे वातावरण निर्माण झाले असुन , याच क्षेत्रातील काही ठिकाणी गटारींचे बांधकाम झाले नसल्याने दुर्गंधीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने त्या ठीकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असुन , या विषयाला घेवुन परिसरातील नागरीकांमध्ये नगर परिषदच्या ढसाळ कारभारामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे . या संदर्भातील वृत्त असे की, यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील फालक नगर या कॉलनीतील फालक नगर बसथांबा ते आयशानगर मार्गावरील डी बी पाटील सर यांच्या घरा समोरील मोकळ्या जागेवर अनेक वर्षापासुन गटारीचे काम झाले नसल्याने त्या ठीकाणी दृर्गंधीचे घाण सांडपाणी जमा झाले असुन , या परिसरात डांसाचा उपद्रव वाढल्याने नागरीकांमध्ये आपल्या कुटुंबातील आरोग्याच्या दृष्टीने भितीचे सावट पसरले आहे . याबाबत यावल नगर परिषदकडे परीसरातील नागरीकांनी अनेक वेळा तक्रार करून देखील नगर परिषद प्रशासनाकडुन थातूरमातुर चौकशी वगळता कुठलेही कार्य झाले नसल्याची ओरड या ठीकाणच्या रहीवासांची आहे .सद्या यावल शहरात व परीसरात डेंग्यु या घातक आजाराची साथ पसरली असुन, नगर परिषदेने तात्काळ नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करून तात्काळ या ठीकाणी गटार बांधावी अन्यथा या परिसरातील नागरीकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .

Spread the love