ममुराबाद -: ममुराबाद गावातील जलजीवन मिशनचे काम उन्हाळ्यात बंद पडले होते. त्यानंतर काही दिवसांनी जि प पाणी पुरवठा विभागाचे काही अधिकारी कर्मच्यार्यांनी पाईपांचे सॅपल तपासणी पाठवल्या नंतर त्याचा तपासणी अहवाल येण्या अगोदरच ठेकेदाराने जल वाहिनीचे काम धुमधड्याकात सुरु केले ठेवले आहे. त्यावर ग्रामपंचायतीचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले आहे. ज्या भागामध्ये कायम टंचाई भासते तो परिसर सोडून दुसरीकडेच जलवाहिनीचे खोदकाम केले जाते आहे.
ममुराबाद गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी लहान व मोठे जलकुंभ उभारण्यात आले आहेत. त्यानुसार वार्ड क्रमांक तीनसाठी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाजवळ जलकुंभ उभारण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्यावरून वार्ड तीनमध्ये पुरेसा पाणीपुरवठा कधीच केला जात नसल्याने मोठा पेच काही
एक वर्षांपासून निर्माण झाला आहे. गावात दुसरीकडे मात्र अक्षरशः धो-धो पाणी वाहते. अलिकडे जलजीवन मिशनमधून नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, असे नवीन उत्तर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडून मिळू लागले होते. प्रत्यक्षात तशी कोणतीच चिन्हे अद्याप दिसून आलेली नाही.
गावात जलवाहिनीचे कामाबाबत व वितरण व्यवस्थेबाबत मि ठेकेदार तसेच उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांचेशी संपर्क केला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गावी गल्ली बोळात कोणत्या प्रकारचे पाईप जात आहे त्याबाबन सुद्धा माहिती मागितली आहे. परंतु अद्यापावेतो संबधीतांनी अशी कोणतीच माहिती ग्रामपंचायतीला पुरवण्यात आलेली नाही.
ग्रामविकास अधिकारी कैलाश देसले
बर्याच वर्षानुवर्षांपासून पाण्याची टंचाई सहन करणाऱ्या ग्रामस्थांना ट्युबवेलचे पाणी पुरवण्यातही ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. वार्ड तीनमधील जिद्दी
चौकात असलेली ट्युबवेल बऱ्याच महिन्यांपासून बंद पडली आहे. त्याजागी नवीन ट्युबवेल करण्याची मागणी संबंधित ग्रामस्थ कधीपासून करीत आहेत; मात्र निधी नसल्याचे कारण सांगून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत फक्त हात उंच करण्याचे काम केले आहे. कायम टंचाईचा भाग सोडून दुसरीकडे जलजीवन मिशनच्या जलवाहिनीचे खोदकाम सुरु असल्याने या भागातील रहिवाशांनी रोष व्यक्त केला आहे.










