झुरखेडा गावातील उपकेंद्रात काही अज्ञात लोकांकडून डॉ. व कर्मचारी वर्गावर दादागिरी करत लसीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केला

0
52

धरणगाव :- तालुक्यातील झुरखेडा येथील उपकेंद्रात दि.१५ सप्टेंबर रोजी गावातील नागरिकांसाठी १०० लसीचे लसीकरण घेण्यात आले

सविस्तर असे की, गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी गावातील नागरिक,महिला वर्ग तसेच वृद्ध,अपंग नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मा जिल्हाधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा करून व  आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या सहकार्याने गावात लसीकरण सुरू केले पण त्याठिकाणी गावातील काही अज्ञात लोकांकडून तेथील डॉ व कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक वर्गाशी दादागिरी करत लसीकरण बंद करण्याचा प्रयत्न पोलीस कर्मचारी यांच्या समोर करण्यात आला तसेच प्रत्येकवेळी लसीकरणा च्या दिवशी ह्या लोकांकडून असे कृत्य केले जात आहे त्यामुळे आता धरणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांनी या कृत्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे  व अश्या अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी गावकाऱ्यांकडून मागणी केली जात आहे

तसेच गावातील काही अज्ञात व्यक्ती दर वेळेस डॉ, व कर्मचारी यांच्याशी दादागिरी करीत असतात त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण होत असते त्यामुळे  अश्या लोकांवर वेळेतच काही पाऊल न उचले गेले तर यापुढे लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यासाठी एकही महिला लसीकरण करण्यासाठी येणार नाहीत त्यामुळे ह्या लसीकरण कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी  अशी मागणी केली जात आहे त्याठिकाणी उपस्थित डॉ, करण पाटील, रविंद्र निळे ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील,आशा सेविका,नर्स व गावातील काही नागरिकांच्या सहकार्याने लसीकरण पार पडले .

Spread the love