भुसावळ ( जितेंद्र काटे ) – भुसावळ तालुक्यातील बेलव्हाळ येथे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मागील भागात निमगाव रस्त्यावर गोविंदा श्रावण पाचपांडे यांचा गुरांचा वाडा असून या वाड्यात दि .२१ आॅक्टोबर चे रात्री ११ ते दि २२ आॅक्टोबर चे पहाटे ३ वाजे दरम्यान बिबट्याने हल्ला करून एक वासरू ठार करून त्याच ठिकाणी खावून टाकले विशेष म्हणजे वासराचा मुंडक्याचा भाग फक्त शिल्लक आहे तसेच दुसऱ्या एका गायीला ही जखमी केले आहे . या प्रकारामुळे शेतकरी भयभीत झाले असून निमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा झाली आहे त्यामुळे बेलव्हाळ ग्रामपंचायतीने लवकरात लवकर गावाच्या आजूबाजूला असलेल्या काटेरी झुडपे तसेच इतर झाडेझुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या भागात नेहमी बिबट्याचे हल्ले होत असतात त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून रिकाम्या खुर्च्या तोडण्या पेक्षा गावागावात जाऊन शेतकऱ्यांची भिती दुर करावी अशी मागणी बेलव्हाळ येथील शेतकऱ्यांनी केली आहे.












