दिपक नेवे
यावल येथील संभाजी पेठेतील बारी समाजाचे कार्यकर्त गोविंद मधुकर बारी यांची भारतीय जनता पक्षाच्या यावल शहराच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे . देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने धनश्री चित्रपटगृहाच्या सभागृहात आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांच्या हस्ते आणी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे , जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ. रंजनाताई प्रल्हाद पाटील , तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी , नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित गोविंद मधुकर बारी यांना पक्षाच्या सरचिटणीसपदावर निवड करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले . गोवींद बारी यांच्या यावल शहर सराचिटणीसपदी निवडी झाल्याबद्दल विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले .












