स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित क्लीन इंडिया प्रोग्राम उद्घाटन व फिट इंडिया फ्रीडम रण 2.0 सांगता येत्या 2 ऑक्टोबर रोजी यावल शहरात होत आहे. नेहरू युवा केंद्रामार्फत संपूर्ण जिल्ह्यात 75 गावांमध्ये रॅली आयोजित करून फिट इंडिया फ्रीडम संदेश देण्यात आला. स्वच्छ व प्लास्टिकमुक्त भारत उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण भारत देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या माहितीनुसार देशातील विविध भागातून 75 लाख टन कचरा मुख्यत प्लास्टिक कचरा एकत्र करण्यात येणार आहे. 2014 मध्ये सुरू झालेल्या स्वच्छ भारत मिशनचा हा भाग आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून स्वच्छ्ता हीच सेवा हा कार्यक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत श्रमदान, स्वच्छ्ता जागृती यात्रा, स्वच्छ्ता चॅम्पियन पुरस्कार आणि सन्मान, ग्रामपंचायत संवाद आदी कार्यक्रम होत आहेत. याच कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय उद्घाटन 2 ऑक्टोबर रोजी यावल शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन यावल रावेर लोकसभा खासदार रक्षा ताई खडसे, प्रांतधिकारी कैलास कडलग साहेब, तहसीलदार महेश पवार साहेब, यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील साहेब, वन विभाग अधिकारी पद्मनाभ साहेब, युवा उद्योजक व दत्त ठिबकचे सर्वेसर्वा युगंधर पवार, सामाजिक कार्यकर्ते अमोल दादा जावळे, नेहरू युवा केंद्र जळगाव ऑफिसर नरेंद्र डागर सर, अजिंक्य गवळी सर तसेच तालुक्यातील निवडक युवक युवतींच्या उपस्थित होणार आहे असे नेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक तेजस पाटील व पल्लवी तायडे यांनी सांगितले. यावेळी तहसील कार्यालयापासून स्वच्छ्ता मोहिमेला सुरुवात होणार आहे….












