यावल राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने सौ योगिता देवकांत पाटील यांचे यावल- रावेर विधान सभेचे आमदार शिरीष दादा चौधरी यांना निवेदन

0
51

दिपक नेवे

यावल -संजय गांधी निराधार योजनेच्या नवनिर्वाचित सदस्यपदी नियुक्ती होताच निराधारांना आधार देण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या संजय गांधी निराधार योजना तालुका सदस्यां तथा छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन च्या सचिव सौ योगिता देवकांत पाटील यांनी आपली निवड होताच संजय गांधी समिती अध्यक्ष शेखर दादा पाटील यांचे मार्गदर्शनात नियुक्ती झाल्या बरोबर आपल्या कार्याची सुरवात करत रावेर- यावल तालुक्यातील कर्तव्यदक्ष आमदार माननीय शिरीष दादा चौधरी यांना निवेदन दिले त्यात संजय गांधी निराधार योजनेत व श्रावणबाळ व अपंग लाभार्थी यांना या योजने कमी वयाचा दाखला व वैद्यकीय प्रमाणपत्र दाखला यावल येथून मिळवे असे विनंती केली आहे कारण ज्या नागरिकांकडे कडे जन्मदाखला नाही लिव्हिंग सर्टिफिकेट नाही व जे लोक अपंग नागरिक आहेत त्यांना वैद्यकीय प्रमाणात मिळवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी जळगाव यांच्याकडे जावे लागते व त्यासाठी नागरिकांची धावपळ होऊन वेळ व पैसा खर्च होतो. होणारा त्रास व गैरसोय टाळण्यासाठी करिता यावल ग्रामीण रुग्णालयात वयाचे व अपंग व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणात पत्र मिळावे म्हणून निवेदन देत विनंती केली . सौ योगिता देवकांत पाटील यांनी निराधार महिलांना आव्हान करत या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना कसा मिळेल या साठी समाजातील सर्वच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घ्यावा व अनाथ व अपंग व निराधाराना मदत करावी . असे आवाहन योगिता पाटील यांनी केले.या प्रसंगी निवेदन देतांना सौ योगिता पाटील यांचे बरोबर कविता पाटील , वाढोदा गावचे सरपंच तथा संजय गांधी समिती सदस्य संदीप सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय गांधी समिती सदस्य दिनकर पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे राष्ट्रवादी उंटावद चे सोसायटी चे चेअरमन शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा विरावली ग्रा. प सदस्य ऍड देवकांत पाटील, राष्ट्रवादी युवक चे युवा नेते राजेश कारंडे यांचे सह अनेक पदअधिकारी यांची उपस्थिती होती .निवेदन देने पूर्वी यावल येथील खरेदी-विक्री संघात कार्यसम्राट माननीय आमदार शिरिष दादा चौधरी यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय शेखर दादा पाटील व समितीच्या सर्व सदस्यांना आशीर्वाद रुपी अभिनंदन करत पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love