जळगाव – तालुक्यातील धामणगाव येथील २३ वर्षीय तरुणाने संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र प्रकाश सपकाळे वय २३ राहाणार धामणगाव ता .जळगाव यांने आज दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास पिक फवारणीचे विषारी औषध सेवन केले. त्यानंतर रविंद्र यांला मोठ्या प्रमाणात अस्वस्थ वाटू लागल्यामुळे नातेवाईकांनी तातडीने जळगाव येथे खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता. राात्री ०८ :०५ वाजेच्या सुमारास रविंद्र यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास पोहेकॉ साहेबराव पाटील हे करित आहे.












