नवरात्रोत्सवातील खर्च टाळत सेवाधर्म परिवार यांनी दिला मानव सेवा तिर्थ ला मदतीचा हात….. जळगाव सेवाधर्म परिवाराचा स्तुत्य उपक्रम

0
52

हेमकांत गायकवाड

चोपडा : जळगाव शहरातील सेवा धर्म परिवार हा विविध सामजिक उपक्रमांना मदतीचा हात देत असतो,या परिवारातील प्रमुख सदस्य असलेल्या अनिता कांकरिया आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी यंदा नवरात्रोत्सव वर होणारा खर्च वाचला असल्याने हा खर्च सामाजिक कार्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला होता

कांकरिया आणि त्यांच्या मित्र परिवारा कडून दर वर्षी किमान लाखभर रुपये नवरात्री उत्सवावर खर्च केले जात असतात

मात्र यंदा कोरोनाचा पार्श्वभूमीवर रास गरबा दांडिया वर निर्बंध राहणार असल्याने साला बांद प्रमाणे होणारा खर्च नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक कार्यावर खर्च करण्याचा निर्णय घेत अनिता कांकरिया यांनी चोपडा तालुक्यातील वेले गाव परिसरात असलेल्या मानव सेवा तीर्थ या मनो रुग्णाच्या साठी काम करणाऱ्या संस्थेस मदत साहित्य वाटप करून अनोख्या पद्धतीने नवरात्री उत्सव साजरा करून समांज्या पुढे एक आदर्श निर्माण केला आहे

सेवा धर्म परिवारातील अनिता कांकरिया,अलका कांकरिया, विजया बाफना,सरिता राका,चंद्रशेखर नेवे इत्यादी प्रमुख सदस्यांच्या वतीने हे मदत साहित्य वाटप करण्यात आले

या उपक्रमाच्या यशस्वी ते साठी दिलीप चौबे,चार्वी पारख,वैशाली कटारिया,कुशल वेद,अनुज बोथरा,सुनंदा लोढा,सुरेखा लूनावत,विमल रायसोनी,महेंद्र रायसोनी,संदेश रायसोनी यांचं सहकार्य लाभले

नवरात्री उत्सवात रास गरबा दांडिया खेळताना जेवढा आनंद मिळत होता त्या पेक्षा ही अधिक आनंद मनोरुग्णांना मदत साहित्य वाटप करताना झाला असल्याची भावना अनिता कांकरिया यांनी व्यक्त केली आहे

सेवा धर्म परिवारातील मदत वाटप कार्यक्रमात सहभागी असलेल्या सदस्यांचे मानव सेवा तीर्थ संस्थेच्या वतीने एन आर पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले आणि मदत केल्या बद्दल आभार ही मानले आहेत.

Spread the love