गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार .

0
57

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

जळगाव -राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव व श्री राजपूत करणी सेना यांच्यातर्फे मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करून सत्कार मूर्तींना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खडका ता.भुसावल येथील रहिवासी काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय,जळगाव या शाळेतील शिक्षक तसेच महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानचिन्ह,शाल देऊन गौरविण्यात आले.

त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला तसेच त्यांना या अगोदर सुद्धा अनेक पुरस्कारांनी विविध सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे. त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Spread the love