प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील गोजोरा येथील लोकनियुक्त महिला सरपंच सौ नंदा लक्ष्मण कोळी या कुऱ्हा पानाचे – वराडसिम गटातून जिल्हा परिषद सदस्य साठी इच्छूक असल्याचे सांगीतले जाते आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी पती माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गोजोरे गावात विविध योजना आणल्या विशेष म्हणजे गावातील सर्व समाजाच्या तरुणांना एकत्र करून गावासाठी अभ्यासिका व व्यायामशाळा, उमेद बचतगट कार्यालय , जिल्हा परिषद मराठी शाळा आदर्श केली. गावात दारुबंदी केल्याने तरुण व्यसन मुक्त होत आहे. गावात साफसफाई , आर ओ प्लँट सुरु करुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. गावात ठिकठिकाणी काँक्रीटीकरण केले. गावाच्या आजूबाजूला रस्त्यावर झाडे लावली. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन तसेच आरोग्य तपासणी ,रक्तदान शिबीरे घेतली तसेच स्मशानभूमी काँक्रिटीकरण,दलित वस्ती पेव्हरब्लाँक, गावात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच नविन तलाठी कार्यालय इमारत अशी कामे करण्यात आली असून

आता या गटात सर्वसाधारण महिला राखीव जागा असल्याने जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवारी दाखल करणार असल्याचा त्यांचा मानस आहे विशेष म्हणजे पती लक्ष्मण कोळी हे माजी सैनिक असल्याने देशसेवा केल्याचा अनुभव असल्याने समाजसेवा करीत गोजोरे गावा प्रमाणे गटातील इतर गावे आदर्श करणार असल्याचे सरपंच नंदा लक्ष्मण कोळी यांनी सांगितले आहे.












