प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – भुसावळ तालुका पोलीसांनी तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील चारही बीट मध्ये हातभट्टी दारु वर कारवाई करीत रुपये १,६६,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
यात दिपनगर दुरक्षेत्रात अशोक तायडे पिंप्री सेकम , रितेश सुर्यवंशी फेकरी , कुऱ्हा पानाचे दुरक्षेत्रात निवृत्ती सोनवणे बेलव्हाय , विलास सपकाळे वराडसीम , साकेगाव बीट मध्ये सागर सोनवणे , भगवान कोळी ,केशव मराठे साकेगाव , किन्ही बीट मध्ये उस्मान गवळी , खलील गवळी युनूस गवळी कन्हाळे या सर्वांच्या ताब्यातील २७० लिटर हातभट्टी दारु तसेच २८०० लिटर कच्चे रसायन मुद्देमाल किंमत १,६६,५००/- रुपयांचा नष्ट केला आहे. ही कारवाई भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२९ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ वाजता करण्यात आली या कारवाईत पोहेकाॅ वाल्मिक सोनवणे , सुभान तडवी , विकास बाविस्कर , सुधीर विसपुते , ईस्तियाक शेख , हेमंत मिटकरी , रशिद तडवी , सुभाष सोनवणे , सचिन पारधी , न्याजजोद्दीन तडवी , किरण तायडे , जगदिश भोई व मपोकाॅ लिना लोखंडे यांनी सहभाग घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांनी सांगितले आहे.










