नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम कडून मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी 

0
18

जळगाव: जिल्ह्यातील नॅशनल व्हॉईस ममिडिया फोरम या पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष उत्तम वानखडे व महासचिव प्रकाश सरदार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनात राज्यपाल व मुख्यमंत्री यांना जळगाव जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत नाशिकचे पालकमंत्री व कुंभमेळा मंत्री यांनी मुद्दाम भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा उल्लेख टाकला याचा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यांनी त्वरीत राजीनामा द्यावा. अशीमागणी निवेदना द्वारे केली आहे.

तसेच त्याचा राजीनामा मुख्यमंत्री यांनी त्वरीत स्वीकारावा अशी अपेक्षा निवेदना मार्फत केली आहे.

हे निवेदन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव रमेश खंडारे, जिल्हा महासचिव सुमित सोनवणे, जळगाव महानगर पालिका अध्यक्ष प्राजक्ता तायडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

Spread the love