महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या महिलांनी आपली eKYC दुरुस्ती पूर्ण केली आहे, त्यांना रखडलेले सर्व हप्ते लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा केली. अनेक लाभार्थी महिलांचे हप्ते eKYC अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीमुळे अडकले होते. मात्र आता eKYC दुरुस्ती केलेल्या सर्व पात्र महिलांना त्यांचे थकित हप्ते देण्याचा निर्णय प्रक्रियेत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यासाठीचा शासन निर्णय (GR) देखील जारी झाला असून, हप्त्यांच्या वितरणाची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तारीख जाहीर झाल्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
किती रक्कम मिळणार?
– ज्या महिलांचे अनेक हप्ते रखडले होते आणि त्यांनी eKYC दुरुस्ती केली आहे, त्यांना एकत्रितपणे सुमारे ₹6000 पर्यंतची रक्कम मिळू शकते.
– ज्या महिलांना आतापर्यंत फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला होता, त्यांना उर्वरित रखडलेले हप्ते मिळून सुमारे ₹4500 मिळण्याची शक्यता आहे.
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
ज्या महिलांनी अद्याप eKYC दुरुस्ती केलेली नाही, त्यांनी तात्काळ आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ वेळेत मिळू शकेल.
सरकारकडून लवकरच अधिकृत वितरण तारीख जाहीर होणार असून, त्यानंतर हजारो महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.









