मोटरसायकल – डंपर अपघातात मोंढाळा येथील इसमाचा मृत्यू !

0
3

प्रतिनिधी -जितेंद्र काटे 

भुसावळ – येथून जवळच असलेल्या चोरवड गावाजवळ कुऱ्हा पानाचे रस्त्यावर मंगल वस्ताद ढाब्याजवळ भुसावळ कडे जाणाऱ्या डंपर व कुऱ्हा पानाचे गावाकडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वाराचा अपघात झाला असता मोटरसायकल स्वार मनोज पांडुरंग वाघ ( वय ३९ ) यांचा मृत्यू झाला ही घटना २० रोजी संध्याकाळी घडली.

या बाबत माहिती अशी की डंपर क्रमांक एम एच १९ – ४९११ हे कुऱ्हा पानाचे कडून भुसावळ कडे जात असताना भुसावळ कडून कुऱ्हा पानाचे गावाकडे जाणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच १९ ईसी ३२३४ लक जोरदार धडक दिल्याने या अपघातामध्ये मनोज वाघ हे गंभीर जखमी होऊन ठार झाले. त्यांचे मोंढाळा ता.भुसावळ येथे सलून चे दूकान असून त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार असून ते घरातील एकमेव कमावते होते.घरातील कमावती व्यक्ती गेल्याने वाघ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत मनोज वाघ मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेचा पंचनामा सुरू असून पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ धिरज मंडलिक करीत आहेत.

Spread the love