नशिराबाद येथे चहाची टपरी फोडून सामानाची चोरी ?

0
2

प्रतिनिधी -जितेंद्र काटे

भुसावळ – नशिराबाद येथे महाजन टी सेंटर येथील रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी टपरी फोडून टपरी मध्ये ठेवलेला सामान व रोख रक्कम घेऊन फरार झाल्याची घटना घडली.या बाबत गजानन सुरेश चौधरी रा.मुक्तेश्वर नगर नशिराबाद यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत म्हटले आहे की दि.२४ मे च्या पहाटे १ वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी महाजन हाॅटेल ला लागून असलेल्या चहाच्या टपरीचा दरवाजा तोडून टपरीत असलेले सामान अंदाजे किंमत ४४००-/रुपये व रोख ५००-/ रुपये असे अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने घेऊन गेले अशी फिर्याद दिली आहे. या बाबत भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे ३०३ (२) नुसार दाखल करण्यात आले असून सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पुढील तपास सपोनि योगीता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ प्रशांत विरनारे हे करीत आहेत.

Spread the love